ब्रेकिंग
गोरोबा काकांच्या अभंगात भक्ती व प्रेमाची अनुभूती : भास्करराव दानवे
कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे पुण्यतिथी साजरी

pub-7425537887339079
वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत , विठ्ठलाचे निष्ठावान भक्त गोरोबा कुंभार यांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाचे प्रेम आणि भक्ती व्यक्त केली.भक्ती आणि वैराग्याने संतांच्या मंडळीत एक विशेष स्थान मिळवलेल्या गोरोबा काकांची पुण्यतिथी पुढील वर्षी अधिक जोमाने साजरी करावी, आयोजनात आपले पूर्ण सहकार्य राहील. अशी हमी भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांनी दिली.
महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने संत गोरोबा काका यांच्या 708 व्या पुण्यतिथी निमित्त प्रतीवर्षाप्रमाणे यंदा ही शनिवारी ( ता.26) कुंभार समाज सामाजिक संस्थेचे मराठवाडा अध्यक्ष दिगंबरराव पेरे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे, जालना मर्चंट्स को- ऑप. बँकेचे संचालक अंकुशराव राऊत,शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, दिगंबर पेरे,जिल्हाध्यक्ष तथा सरपंच बद्रीनारायण भसांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.