कु. साईराज प्रविण पाटील यांना शिष्यवृत्ती प्राप्त. सर्व स्तरातून साईराजचे अभिनंदन व कौतुक.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (१८ फेब्रुवारी २०२४) इयत्ता ८ वी इंग्रजी माध्यम मध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटी नवी मुंबई हायस्कूल वाशी या शाळेचा गुणवंत विद्यार्थी कु. साईराज प्रविण पाटील यांस शिष्यवृत्ती(स्कॉलरशिप ) प्राप्त झाली आहे. शिष्यवृत्ती(स्कॉलरशिप )मिळाल्याने कु. साईराज प्रविण पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साईकृपा इंग्लिश अकॅडमी, या उलवे नोड मधील नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक प्रविण पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. कु.साईराज प्रविण पाटील यांनी शिक्षक, आई, वडिल, गुरु या सर्वांचे या यशात मोलाचे योगदान आहे असे सांगत सर्वांचे आभार मानले आहेत. हुशार कुशाग्र बुद्धिमत्तेच्या साईराजला स्कॉलरशिप प्राप्त झाल्याने उरण पनवेलचे नाव उंचावले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.