राजू गायकवाड यांना आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान .

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.2
अहिल्यानगर येथील सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान पुरस्कार आळंद बोरखेडी गट ग्रामपंचायतचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव गायकवाड यांना गुरुवारी ता.३० प्रदान करण्यात आला.आळंद बोरखेडी चिंच गावाचा शैक्षणिक, सामाजिक, गाव विकास करण्यासाठी राजू गायकवाड यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ श्रीकांत धुमाळ, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्यासह अनेक मान्यवरांची या पुरस्कार होण्यासाठी उपस्थिती होती. राजू गायकवाड यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , आमदार तथा पंचायतराज अध्यक्ष संतोष दानवे , शालिकराम म्हस्के, मधुकर गाढे, मनोज शिंदे, विजय परिहार, उद्धव दुनगहू, नाना भागिले, कौसर शेख,, राजेश मस्के, गोविंदराव पंडित, संतोष लोखंडे, दत्तू पंडित, देविदास देशमुख, सुधीर पाटील, दीपक वाकडे,, शरद गायमुखे, अनंता मापारी, सुरेश दिवटे, मधुकर गोफणे, जाफराबाद तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.



