बरडशेवाळा सह परिसरात श्रीकृष्ण जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.8
हदगांव तालुक्यांसह बरडशेवाळा पळसा मनाठा सह परिसरात प्रत्येक गावात, मंदिरात, घरोघरी, शाळा, अंगणवाडीत, ठिक ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. शाळा अंगणवाडीत शालेय विद्यार्थी लहान बालके श्रीकृष्ण राधाकृष्ण वेशभूषा प्रधान केली होती.
बरडशेवाळा श्रीकृष्ण जन्मोत्सव समीतीच्या वतीने एक सप्टेंबर रोजी सर्व भक्तगणाच्या उपस्थितीत गुरूपुजन सोहळा संपन्न झाला.तर दरवर्षी प्रमाणे बरडशेवाळा श्रीकृष्ण मंदिरात मंदिराचे प.पु.म.
नवगावकर बाबा भोजने व मंदिराचे संचालक जग्गु दादा भोजने, तपस्वी बबीताई भोजने, अर्चनाताई भोजने, शितलताई भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी व परिसरातील सदभक्त मंडळीच्या उपस्थितीत बुधवार सहा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता जन्मोत्सव झाला.यानिमीत्ताने शिवशक्ती भजनी मंडळ मरळक व शिवपार्वती भजनी मंडळ वारकवाडी येथील संगीत भजनी मंडळाचा सामना करण्यात आला होता. गुरुवार सात सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी बरडशेवाळा सह परिसरातील भक्त मंडळासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.