जुन्या बस स्थानक परिसरातील अस्वच्छ शौचालय, परिसरात घाणीचे साम्राज्य, सुस्थितीत करण्याची मागणी
जाफराबाद/विशाल देशमुख,दि.8
टेंभुर्णी गावातील सगळ्या ठिकाणी विशेष करून गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून येथील खालच्या बसस्थानक मधील असलेली जुने बस स्थानक परिसरातील शौचालय अस्वच्छ असून ते अनेक दिवसांपासून स्वच्छ केलेले नाही. त्या परिसरात दुर्गंधी पसरत असून व गवत उगवले आहे. त्यामुळे ह्या अस्वच्छ परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. म्हणून विनंती आहे की शौचालय त्वरित स्वच्छ करावे अशी मागणी गावकरी व व्यापारी यांच्या वतीने ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन केली आहे. गावातील नाली सफाई बाजार स्थळी असलेली घाण येथील सर्वच अंगनवाडी येथे असलेली घाण आणि तिथे उघड्यावर होत असलेली संडास या मुळे गावकरी यांचे आरोग्य धोक्यात आले असून रुग्ण संख्येत वाढ झाली असून तत्काळ या बाबत अंमलबजावणी करण्याची सूचना या वेळी ग्राम पंचायत ला करण्यात आली.
या अर्जावर खालील प्रमाणे नागरिकांच्या सही आहेत त्या पैकी श्री.जनार्दन रामकिसन झोरे.गजानन मुळे (शहर अध्यक्ष)
शुभम मुळे विशाल झोरे,रामेश्वर खांडेभराड, योगेश शर्मा,दिंगबर तांबेकर,कारभारी पाचे शिवाजी देशमुख, सुनील गवळी, लाला कुरेशी,नागेश डोंमळे, शेख जमीर, अमन खान सुनील डोमळे, आदी नागरिकांच्या आणि व्यापारी वर्गाच्या सही या निवेदन वर आहे.



