नवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान
जालना/प्रतिनिधी,दि.26
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने जालना शहरातील मधूर बँक्वेट हॉल येथे लघु व सुक्ष्म उद्योजकांसाठी 27 जून रोजी एकदिवसीय कार्यशाळा सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
एमएसएमई अर्थात उद्योजकांना सरकारी मदत आणि औपचारिक बँक कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे, बँकर्स, सरकारी अधिकारी आणि यशस्वी उद्योजकांशी व्यापक विकासासाठी नेटवर्किंग संधी वाढवण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
सिडबी, केव्हीआयसी/केव्हीआयबी, नाबार्ड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता चे वरिष्ठ अधिकारी, यशस्वी उद्योजकदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाचे मूख्य अतिथी रिझर्व्ह बँकेचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक संचालक श्री सुमन रे असणार आहेत. त्यासोबतच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांचे अंचल प्रबंधक यांची सुद्धा या कार्यशाळेसाठी उपस्थिती असणार आहे.
तरी यात अधिकाधिक सुक्ष्म, लघु उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक श्री मंगेश केदार यांचेकडून करण्यात आले आहे.



