महाराष्ट्र

कृषी योजनांमध्ये भ्रष्टाचार; चार अधिकाऱ्यांसह पाच कंपन्यांना नोटिसा

जालना/प्रतिनिधी :दि.21

जिल्ह्यात नानासाहेब कृषी संजीवनी योजना, प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना (पोखरा) या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने कृषिमंत्री दादा साहेब भुसे यांनी शुक्रवारी चार अधिकाऱ्यांसह पाच कंपन्यांना नोटिसा दिल्या. दरम्यान बारा वितरकांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कृषिमंत्री भुसे म्हणाले की, जालना जिल्ह्यात नानासाहेब कृषी संजीवनी योजना प्रधानमंत्री सिंचन योजना व पोखरा या योजनेत मागील सरकारच्या काळात मोठी अनियमितता झाली आहे. यासंदर्भात जिल्हा कृषीअधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी सचिव व आयुक्त यांच्या देखरेखीखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक अनियमितता झाल्याचे ही ते यावेळी म्हणाले. याप्रकरणी बारा विकरकांचे परवाने रद्द करण्यात आले असून काही कंपन्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ठिबक व तुषार सिंचन उत्पादक कंपन्यांकडून मागवलेल्या माला पेक्षा जास्त मालाचा पुरवठा या योजनेत दाखवून लाभ उठविण्यात आल्याचा संशय आहे. जे लाभ घेण्यास पात्र नाहीत अशा बोगस लाभार्थ्यांना अशा बनावट कागदपत्रांद्वारे लाभ दाखविण्यात आला असल्याचेही सकृतदर्शनी दिसत असल्याचे भुसे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close