जिनिअस प्री स्कुलचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
नवी मुंबईतील उलवे मध्ये असलेल्या जिनिअस वर्ल्ड प्री स्कुलचा पाचवा वर्धापन दिन नेरुळ येथील आगरी कोळी भवन याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला उलवे अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रतीक शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली त्यांचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवेचे शहर अध्यक्ष संतोष काटे यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले व सर्व मान्यवरांच्या हस्ते स्कुलच्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात शाळेच्या लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल स्वतः कला सादर करतं उपस्थितांची मनं जिंकली.
आमच्या शाळेत मुलांना भविष्यात त्यांनी मोठं व्यक्तिमत्व झालं पाहिजे याचीच शिकवण आम्ही मुलांना देतो तसेच या शाळेमध्ये मुलांना टाकल्याचा आम्हाला खुप आनंद असून या शाळेतील सर्व मंडळी मुलांवर बारीक लक्ष देऊन काळजी घेतात असं या कार्यक्रमाला आलेल्या पालकांनी सांगितले.