pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 30 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक

0 1 2 0 9 1

जालना/प्रतिनिधी,दि. 5 

सेवायोजन कार्यालये कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनूसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी कार्यालये ज्यामध्ये 25 व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी मार्च-2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर-1 विवरणपत्र रविवार दि. 30 एप्रिल 2023 पुर्वी संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये,  अंगिकृत उद्योग/व्यवसाय/महामंडळे, स्थानिक संस्था, जिल्हा परिषद/पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय,कारखाने यांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणपत्र  ई-आर 1 माहे मार्च-2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (30 एप्रिल 2023 पर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र  www.rojgar.mahaswayam.gov.in   या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची मार्च -2023 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 रविवार दि.30 एप्रिल 2023 पुर्वी सादर करावेत. यासाठी  www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळ ओपन करुन, एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई- आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्टी वगळुन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या (02482) 299033 या दुरध्वनीवर संपर्क साधावा. याकामी कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 0 9 1