लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीचे औचित्य साधून जासई येथे विविध विकास कामांचे उदघाटन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायदयाचे दशक पूर्ती झाल्याने दशकपूर्तीचे औचित्य साधून दिनांक २८/०४/२०२५ रोजी उरण तालुक्यातील जासई येथे आदर्श सरकार सेवा केंद्र उद्घाटन करण्यात आले,जासई माऊली नगर बंजारवाडीअंतर्गत १५ टक्के मागासवर्गीय ग्रामनिधी पेव्हर ब्लॉक बसवणे, एकटघर जिमचे साहित्य व निवार शेडचे उद्घाटन,रांजणपाडा स्मशानभूमी शेड व आर .सि .सि रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.दशकपूर्तीचे औचित्य साधून विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोषशेठ घरत,उपसरपंच विनायक पाटील ,ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कु.आदित्य घरत,श्रीमती माईताई पाटील, सुदर्शन पाटील ,प्रशांत म्हात्रे ,रामकिशोर ठाकूर ,विनायक पाटील,वीणा घरत ,सुलोचना घरत ,आश्र्विनि नाईक ,श्रुष्टी म्हात्रे ,जयश्री घरत ग्रामविकास अधीकारी भास्कर पालकर व नागरिक उपस्थित होते .