pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी  13 मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याची सूचना 

0 1 7 8 7 6

 जालना/प्रतिनिधी,दि. 29

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील कामगारांना सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सवलत देणे आवश्यक आहे. तरी जालना जिल्ह्यातील कामगारांना  शासन परिपत्रकानूसार 13 मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, अशी सूचना सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जालना जिल्ह्यात सोमवार दि. 13 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार असून सदरहू दिवशी सर्व निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी तसेच निवडणूक होणाऱ्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) येथे मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीची विशेष सवलत देण्यात यावी, असे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 23 मार्च,2024 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये आदेशीत केले आहे. याबाबतीत उदभवणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जालना येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापना करण्यात आलेला असून संबंधित कामगार,  कामगार संघटनांनी दुरध्वनी क्रमांक 02482-230296 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे