pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संच मान्यतेच्या चुकीच्या धोरणाला प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध.

0 3 8 4 2 7

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.26

शिक्षण संचालक कार्यालयाने 20 नोव्हेंबर 2025 च्या पत्रानुसार 2024-25 च्या संच मान्यतेवर समायोजन करण्याचे निर्देशित केलेले आहे. परंतु 2024-25 ची संच मान्यतेमध्ये अनेक त्रुटी आहेत. तसेच या संच मान्यतेनुसार समायोजन करण्याअगोदर शिक्षक संवर्गातील सर्व पदांची पदोन्नती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या बाबीचे सुद्धा पालन करण्यात आलेले नाही. या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे तेवढ्या जागा सुद्धा जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाहीत. तसेच ही संचमान्यता 30 सप्टेंबर 2025 रोजी कालबाह्य झालेली आहे. 30 सप्टेंबर 2024 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित ही संच मान्यता असल्यामुळे आज रोजी विद्यार्थी संख्येत बदल झालेला आहे. यामुळे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होणार नाही. व याचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होईल.
त्यामुळे 2025-26 च्या संच मान्यतेवर आधारित समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच या अगोदर शिक्षक संवर्गातील सर्व पदांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. ही संच मान्यता आज रोजीच्या विद्यार्थी पटसंखेवर आधारित असल्यामुळे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध होतील.
यामुळे 2024/25 च्या संच मान्यतेवर आधारित समायोजनाची प्रक्रिया न राबवता 2025/26 च्या संच मान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात यावी असे आशयाचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांना देण्यात आले. शिक्षण अधिकारी बैठकीनिमित्त कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे प्रशासन अधिकारी सोनवणे साहेब यांना समायोजनासह शिक्षकांच्या खालील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
1. प्राथमिक शिक्षकांच्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी,मुख्याध्यापक पदोन्नत्या संदर्भात राज्य शासनाकडून टीईटी (TET) आवश्यक विषयी कोणतेही पत्र नसल्यामुळे प्रलंबित पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात.
2. इ. गव्हर्नर्स प्रणालीमुळे प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या संचिका थांबविण्यात आलेल्या आहेत त्या तात्काळ निकाली काढण्यात याव्यात.
3. प्राथमिक पदवीधारातून मुख्याध्यापक पदी पदोन्नत शिक्षकांना एक अतिरिक्त वेतन वाढ देण्याच्या पत्राची अंमलबजावणी करण्यात यावी.
4. सर्वच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून वेतनश्रेणी देण्यात यावी.
5. सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे पत्र आपल्या स्तरावर निर्गमित करण्यात यावे.

यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब जुंबड तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री दिलीप जायभाये, पदाधिकारी सर्वश्री सुभाष भडांगे, मंता फुके, सुधाकर पवार, प्रमोद पवार, गौतम ढवळे, सुखदेव खरात, माधव भोसले,मनोज जुंबड, सुदर्शन भुतेकर तसेच सहकारी शिक्षक श्री यशवंत मोरे गणपत शेळके, रामेश्वर मोरे इत्यादी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे