आर. एस. पी. विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी राबविला स्वच्छता अभियान

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे
एन आय उरण या शाळेमधील आर. एस. पी. विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी उरण नगर परिषदेच्या विमला तलाव गार्डन येथे मोठया प्रमाणात साफसफाई केली. दहा दिवसांच्या गणपती मूर्तीचे विमला तलाव गार्डन मधील तलावात विसर्जन झाले. यावेळी मोठया प्रमाणात कचरा निर्माण झाला. त्यामुळे विमला तलाव येथे अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ करण्यासाठी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे
एन आय उरण या शाळेमधील आर. एस. पी. विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थी यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी विमला तलावा जवळील व आजूबाजूचा परिसरातील कचरा उचलून साफ सफाई करण्यात आली.शाळेतील शिक्षक सोमीनाथ खरमाटे व मुकद्दर तडवी या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत होते .