pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा उरण रायगड येथे भव्य पादुका दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न..

0 1 7 4 0 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रमानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नानिजधाम (महाराष्ट्र ) यांच्या उरण येथील पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगदगुरु श्री”च्या सिद्ध पादुकां समवेत भव्य दिव्य शोभा यात्रेने सकाळी १० वाजता , जि.डी.एल. पेट्रोपपंप खोपटा रोड येथून नवघर गाव – फुंडे रोड – नवघर पाडा – कनकेश्वरी मैदान या मार्गाने करण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये कलशधारी महिला, निशाण धारी, राम दरबार, झाशीची राणी, ढोल ताशा, लेझिम , धर्मक्षेत्र, झेंडाधारी, असे विविध कलापथका सहभागी झाले होते.या पादुका दर्शन सोहळा प्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ” जगदगुरु श्री” च्या पादुकांचे आगमन, आरती, सामाजिक उपक्रम सोहळानंतर गुरुपूजन, प्रवचन, उपासक दिक्षा दर्शन, पुष्पवृष्टि असे अनेक कार्यक्रम योवेळी संपन्न झाले.
आजच्या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून ज.न. म.संस्थानला फिरत्या शौचालयाचे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड च्या वतीने लोकार्पण करण्यात आले..

या पादुका व दर्शन सोहळाप्रसंगी व्यासपीठावर मनोहरशेठ भोईर – माजी आमदार उरण विधानसभा,महेंद्रशेठ घरत – रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,जे एम. म्हात्रे – माजी नगराध्यक्ष पनवेल, रमेश ठाकूर – माजी उपनगराध्यक्ष उरण नगरपरिषद,नारायण शेठ घरत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, विकास नाईक उरण तालुका शेकाप चिटणीस,सविता नितीन मढवी- सरपंच नवघर,कुणाल पाटील – सरपंच पागोटे, सुरेश बंडा – माजी उपसरपंच नवघर, रुपेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका उपसंघटक,जी.के. म्हात्रे – ग्रामसेवक नवघर,राकेश खराडे – संपादक, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह,परेश पाटील – अध्यक्ष नवघर ग्रामस्थ मंडळ, प्रियदर्शनी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य नवघर हरीचंद्र पाटील – उद्योजक,प्रकाश पाटील बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपमेंट, डोंबिवली, दिपक खरुडे पीठ व्यवस्थापक नाणिज,उदय रणभरे – ज न म संस्थान ट्रस्टी, अप्पा सोमदे पादुका दर्शन सोहळा दवरा प्रमुख, गणेश मोरे- नाशिक उपपीठ प्रमुख, अरुण कुथे – माजी पीठ सहाय्यक, अविनाश जागृष्टे मुख्य पीठ युवा निरीक्षक, सीमा पाटील महिला पीठ निरीक्षक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा महाराष्ट्रात खूप मोठा भक्त वर्ग असून त्यांच्या हितचिंतकांनी संख्या खूप मोठी आहे. जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक विविध सामाजिक उपक्रम सूरु आहेत. नुकत्याच १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या अवघ्या १६ दिवसांमध्ये महाराष्ट्रसह इतर ६ राज्यांमध्ये पार पडलेल्या ८५० महाक्तदान शिबिर मधून महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्यांच्या रक्तपेढ्याना ८१२६० रक्त कुपिकांच रक्तदान करण्यात आले. करोना काळात मा. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयाची आर्थिक मदत,मा. पंतप्रधान सहायता निधीसाठी बावन्न लाख रुपयांची आर्थिक मदत, रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाला १० लाखाचा धनादेश, रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला १५ लाखाचा धनादेश जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या माध्यमातून करण्यात आले.जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनमानसामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते ११ मार्च २०२४ या कालावधीत ५३ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले. ब्लड ईन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्तांची गरज भासते त्या त्या ठिकाणी हॉस्पीटल येथे जाऊन आजपर्यंत २०००० पेक्षा जास्त रक्तदात्यानी रुग्णांना वेळीच रक्त देउन त्यांचे प्राण वाचविले आहेत. महापूर, भूकंप आदि नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही अखंडपणे संस्थानतर्फे रुग्णसेवा सुरू होती. आज संस्थानतर्फे ५२ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत आहेत. या शिवाय समाज जागृती लोक प्रबोधन, व्यसन मुक्ती, संस्कृतीचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत.महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते. तशीच मोठ्या प्रमाणात गर्दी उरण तालुक्यातील कानकेश्वरी मैदान, नवघर पाडा येथे पाहावयास मिळाली.जवळ जवळ २०००० ते २५००० भाविक भक्तांची येथे उपस्थिती होती.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनचे सर्व पदाधिकारी ,जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य, स्व स्वरूप संप्रदायचे सर्व भक्तगण, शिष्य वर्ग, उपासक यांनी विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे