अंजली आनंदराव निरदोडे NMMS शिष्यवृत्तीस पात्र

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.15
मौजे घुंगराळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील कु अंजली आनंदराव निरदोडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार आर्थिक दुर्बल घटक यामध्ये शिष्यवृत्तीस पात्र झाल्यामुळे कु अंजली निरदोडे हिच्या स्वग्रही घुंगराळा येथे जाऊन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध किर्तनकार हभप राम महाराज पांगरगेकर,स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे सचिव शिवाजीराव पांगरेकर राज्य सचिव ह भ प व्यंकटराव महाराज जाधव माळकौठेकर प्रसिद्धी प्रमुख ह भ प चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर, ह भ प बालाजी महाराज पवार पार्डीकर ह भ प बालाजी महाराज माळकौठेकर ह भ प बालाजीराव जामकर इत्यादी मान्यवर कुं.अंजलीच्या आजी श्रीमती सुंदरबाई निरदोडे वडील आनंदराव निरदोडे आई सावित्राबाई निरदोडे वरील सर्वांच्या उपस्थितीमध्ये अंजलीला मिळालेल्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला व भावी शैक्षणिक जीवनासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या