pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अपहरण झालेल्या मुलीबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागास संपर्क साधण्याचे आवाहन

0 1 1 8 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.20

जालना जिल्ह्यातील नाव्हा येथील रहिवासी असणारी अल्पवयीन मुलगी कु. श्रध्दा सदाशिव पवार वय 14 वर्ष हीचे आरोपी अल्केश गणेश सरकटे रा.नाव्हा याने अपहरण केले आहे. तरी मुलगी कु.श्रध्दा ही दिसून आल्यास अथवा तिच्याविषयी काही माहिती असल्यास  नागरिकांनी पोलिस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जालना तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप सावळे यांनी केले आहे.
दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुलगी कु. श्रध्दा सदाशिव पवार वय 14 वर्ष राहणार नाव्हा ता. जि. जालना येथून आरोपी अल्केश गणेश सरकटे रा.नाव्हा याने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी अमीष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. फिर्यादी अश्विनी सदाशिव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा कलम 363 भादंवीप्रमाणे दाखल केला आहे.
मुलीचे  वय 14 वर्ष असून वर्णनामध्ये बांधा मजबुत, रंग सावळा, चेहरा लांब, नाक सरळ, उंची 5 फुट, भाषा मराठी व हिंदी, बोलता येत असून अंगात कपडे हिरवट रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची पॅंन्ट, पायात चप्पल  घातलेली आहे.  या मुलीविषयी काही माहिती असल्यास संपर्क  पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन तालुका जालना दुरध्वनी क्र. 8975023100,  तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सावळे (मो. 9604911505 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4