आज( दि.11) रोजी सकल हिंदू मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहे.
प्रमुख मागण्या : 1) मयत अक्षय पाटोळेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 2) मयत अक्षय पाटोळेच्या मारेकऱ्यांवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी . 3) मयत अक्षय पाटोळे चे फरार असलेले मारेकरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी. 4) मयत अक्षय पाटोळे यांना शासनाकडून आर्थिक मदत करुन कुटूंबाचे पुर्णवर्सन करुन पोलीस सरंक्ष देण्यात यावे यावे. 5) मयत अक्षय पोटोळे यांच्या मारेकऱ्यांवर फॉस्ट ट्रक कोर्टात केस चालवून ऍडर ट्रायल खटला चालवावा. 6) मयत अक्षय पाटोळे या प्रकरणात प्रख्यात वकील ऍड. उज्जवल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी. 7) मयत अक्षय पाटोळे यांच्या पत्नीस शासकीय नौकरीस समाविष्ट करण्यात यावे. 8) मयत अक्षय पाटोळे यांच्य हत्ते प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अबुलकर व कर्मचारी यांनी कर्तव्यात कसुर केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. 8) तालुका पोलीस ठाणे येथे दलित महिला फिर्याद घेऊन गेली असता तिच्या सोबत असणारा सामाजिक कार्यकर्ता तिला तहान लागल्याने पोलीस ठाण्यातील असलेले पाणी दिले त्याकारणा वरुन कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची तक्रार वरिष्ठाकडे का केली या द्वेष भावनाने महिला सोबत आलेले सामाजिक कार्यकर्तावर खोटे गुन्हे दाखल करणारे व दिलेली तक्रार मागे घ्या असे दबाब टाकणारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांची चौकशी करुन तात्काळ निलंबीत करण्यात यावे.या निवेदनावर संजय इंचे शिवराज जाधव कृष्णा पांडव विकी हिवाळे अर्जुन धाकतोडे राम सुतार विकी कारके नितीन पाखरे नितीन लांडगे अशोक साबळे परमेश्वर गोखले शैलेश शेवाळे संतोष पांडव अमित कुलकर्णी अर्जुन डहाळे माजी नगरसेवक महेश दुसाने हिंदुराष्ट्र सेनेचा जिल्हाध्यक्ष शालिक वाघ बाबा आनंद आहेर. यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा