pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.22

दि.24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिनानिमित्त दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रास अप्पर जिल्हाधिकारी सरीता सुत्रावे, वरीष्ठ न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसिलदार छाया पवार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व्हि.व्हि. महिंद्रकर, अॅड. महेश एस. धनावत, ग्राहक पंचायत महाराष्ट्र चळवळीचे मोहन इंगळे, संजय देशपांडे व इतर सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रतिवर्षी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने केंद्र शासनाने ग्राहक आयोगातील तक्रारी प्रभावीपणे निकाली काढणे या संकल्पनेवर आधारीत शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे चर्चासत्र आयोजित केले आहे.चर्चासत्रास नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर- पालवे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे