तरुणांनी शरीर सुदृढ बनवावे ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनावे .माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे तरुणांना आवाहन

भोकरदन/ संजीव पाटील,दि.12
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सुरंगली परीसरात दौऱ्यावर असताना त्यांनी तरुणांशी संवाद साधला. तरुणांनी आपले शरीर सुदृढ तंदुरुस्त रहावे यासाठी रोज व्यायाम करावा . यांसाठी सुरंगली गावांसाठी साडेसात लाख रुपये निधी उपलब्ध करून व्यायाम शाळा दिली आहे.गावातील तरुणांनी त्याचा फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करून एम.पी.एस.सी. परीक्षा देऊन अधिकारी बनावे असे आव्हान रावसाहेब दानवे यांनी तरुणांना केले . यावेळी राहुल जाधव पाटील, रामदास टोंपे,दत्तु टोपें , भगवान भोंडे, विष्णू भोंडे, रामेश्वर जाधव पाटील, सतीश सुरेशं जाधव, ज्ञानेश्वर साक्रबां दांडगे,पत्रकार सुभाष वर्पे, रामभाऊ वानखेडे, माजी उपसरपंच संजय जाधव पाटील, भाऊराव भोंडे यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते.यावेळी दानवे शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.