pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे मदरशांना आवाहन 

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.1

अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील मदरशांनी पात्र मदरशांनी दि.15 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करुन डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांस समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे गरजेचे आहे.  मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता नववी, दहावी व बारावी तील तसेच औद्योगिक शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल.  या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देणे यादृष्टीने डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासन मंजूरी देण्यात आलेली आहे. शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करून तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या मदरशांनी अर्जासोबत शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांच्या मूळ/साक्षांकित प्रती जोडून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 15  जानेवारी 2024 पर्यंत आहे, याची नोंद घ्यावी. तसेच सदर योजनेच्या अर्जाचा नमूना महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय अंतर्गत तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या (https://mdd.maharashtra.gov.in) संकेतस्थळावर योजना-शैक्षणिक अंतर्गत अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तसेच https://jalna.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे