pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत – जिल्हा कोषागार अधिकारी

0 3 8 4 4 1

जालना/प्रतिनिधी,दि. 28 

राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतन धारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये हयातीचे दाखले बँकेत सादर करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने हयात प्रमाणपत्राची संगणकीकृत यादी कोषागारातून बँकेत पाठविण्यात आली आहे. सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र दि. 1 नोव्हेंबर, 2025 नंतर संबंधीत बँकेत ओळखपत्राच्या पुराव्यासह जावून दि. 15 नोव्हेंबर, 2025 पुर्वी द्यावे. तसेच जीवन प्रमाणन  प्रणालीवर आपला हयातीचा दाखला अचुक माहिती नोंदवून सुध्दा करता येईल. शक्य न झाल्यास प्रत्यक्ष कोषागारात हजर राहून हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यात यावे, अन्यथा डिसेंबरचे निवृत्तीवेतन थांबविण्यात येईल. असे जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे  कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे