मुलीने पेट्रोल टाकून जाळलेल्या त्या आईचा अखेर मृत्यू ९ दिवसाचा संघर्ष संपला

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.9
मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात एका विवाहित मुलीने आपल्या जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून दि.२८ मार्चला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात ती महिला ८० टक्के जळाली होती. दि. ६ एप्रिल ला त्या महिलेचा उपचारादरम्यान करुण अंत झाला. दीपाली प्रतीक पाचघरे रा. यशवंत कॉलनी असे आईला पेटवणार्या मुलीचे नाव असून संगीता लंगडे असे मृत महिलेचे नाव आहे. दीपालीला एक चार वर्षांची मुलगी व एक आठ महिन्यांचा मुलगा आहे. पाचघरे कुटुंब हे पत्नी दिपालीला घेऊन पंजाबराव देशमुख कॉलनी येथे राहत होते. मात्र काही महिन्यांपासून दीपाली ही आपल्या दोन मुलांना घेऊन आपले वडील विनोद लंगडे यांच्या यशवंत कॉलनी स्थित जिजामाता शाळेजवळ असलेल्या घरात राहत होती. त्या ठिकाणी दीपालीचे वडील, आई संगीता लंगडे व लहान बहीण राहत होती. २८ मार्च ला सकाळी दीपाली प्रतीक पाचघरे वय ३३ हिने आपली आई संगीता ही झोपेतून उठून बसली असताना अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये संगीता ही ७५ टक्के जळाली होती. आरडाओरडा ऐकून शेजा-यांनी व नातेवाईकांनी संगीता लंगडे हिला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भरली केले होते.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून तिला पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल केले होते. त्या ठिकाणी संगीता ह्या जीवन मरणाशी संघर्ष करीत होत्या. मात्र दि. ६ एप्रिल ला सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आधी सुद्धा दिपाली ने आपल्या आजी सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारून टाकल्याची घटना में २०२४ रोजी घडली होती. त्यावेळी सुद्धा दीपालीने स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली होती.