pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि.6

छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत जागतिक टपाल दिन व राष्ट्रीय टपाल सप्ताह दि.9 ते 13 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा केला जाणार आहे. अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर, विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सोमवार दि.9 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक टपाल दिनानिमित्त सर्व प्रशासकीय व टपाल कार्यालयामध्ये स्वछता मोहीम राबवून नीटनेटके आणि स्वच्छ दिसण्यासाठी जुने होर्डिंग, कालबाह्य नोटिस, सूचना काढण्यात येतील. मंगळवार दि.10 ऑक्टोबर 2023 रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवसानिमित्त डाक समुदाय विकास कार्यक्रम (डाक चौपाल) या अंतर्गत भारतीय डाक विभागाच्या विविध बचत योजनांची माहिती देण्यासाठी व खाती उघडण्यासाठी औरंगाबाद विभागांतर्गत विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारमधील सर्व लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात येईल.
बुधवार दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी फिलाटेली दिवसानिमित्त औरंगाबाद प्रधान डाक घर येथे शालेय मुलांचा सहभाग करून फिलाटेली सेमिनार व प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच या दरम्यान त्यांना तिकीटांचा संग्रह करण्यासंदर्भात ढाई आखर व दिन दयाळ स्पर्श योजना याविषयी विस्तृत माहिती देण्यात येईल. गुरुवार दि.12 ऑक्टोबर 2023 रोजी मेल आणि पार्सल दिवसानिमित्त सर्व पोस्ट मास्टर व वितरण कर्मचारी यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. तसेच ग्राहकांसाठी मेळाव्याचे आयोजन करून त्यांना टपाल विभागातील वितरण प्रणाली विषयी माहिती देऊन त्यांचा अभिप्राय घेण्यात येईल.
शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी अंत्योदय दिवसानिमित्त प्रधान डाकघर औरंगाबाद व जालना तसेच सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे चर्चासत्र आयोजित केले जाईल. यामध्ये गरीब, उपेक्षित आणि मागासलेल्या घटकांच्या उत्थानाशी संबंधित प्रकरणे, योजना हाताळणारे संबंधित राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी उपलब्ध असतील. ग्रामीण व दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती सह आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिरे आयोजित केली जातील. तसेच या कालावधीत सर्व ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरण, सामाजिक सुरक्षा पेन्शन, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी खाती, महिला सम्मान बचत प्रमाणपत्र, एईपीएस आणि पोस्ट विभागाची इतर उत्पादने आणि सेवा यांच्या उपलब्धतेबाबत जागरूक करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2