pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे ता पेणचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात समारंभ.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31

सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यालय रावे ता पेण चे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ २९ डिसेंम्बर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना रायगड जिल्हा अध्यक्ष रामदास शेवाळे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, भगवान रामदास पाटील. अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण प्रसारक मंडळ रावे पेण निवृत्त डी वाय एस पी. हे होते.या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने चित्रकला, हस्तकला, रांगोळी प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शनाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.एकापेक्षा एक सरस रांगोळ्यानी मान्यवरांचे मन विद्यार्थ्यांनी जिंकले.विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिकृती तयार केल्या होत्या.दैनंदिन जीवनात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आणि हे लहानगे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत असे वाटले.हे सर्व पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खूप तयारी केल्याचे दिसून आले.यानंतर दीपप्रज्वलनाने पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम टी पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना म्हात्रे मॅडम यांनी अतिशय सुरेख आणि ओघवत्या शैलीत केले.
यानंतर स्वागत गीत आणि सत्यम शिवम सुंदरा हे गीत झाले.तसेच छत्रपती शिवरायांचे अंगावर रोमांच उभे राहणारे नृत्य झाले.एक लहानग्या मुलीने झक्कास लावणी नृत्य सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळवली.विद्यार्थ्यांचे लेख असलेल्या ज्ञानज्योत या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात रामदास शेवाळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईल वर गेम न खेळता क्रीडांगणावर खेळ खेळावेत.इंटरनेट, टीव्ही यांच्यापासून दूर राहून अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख पाहुणे मिलिंद खारपाटील यांनी प्रदर्शन आवडल्याचे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याने, तसेच त्यांना हे एक व्यासपीठ मिळत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे असेही सांगितले.तसेच त्यांचे वडील कैलासवासी गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रावे शाळेला २० पुस्तके भेट दिली .तसेच वाचाल तर वाचाल हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. रावे गावात पूर्वी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. विद्यार्थ्यांनी चिखल आणि पाण्यातून पायपीट करून खडतर असे शिक्षण घेतले .गावातील विद्यार्थी शिकले पाहिजेत.त्यांना शिक्षण घेण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून १९९२ साली हायस्कूल झाल्याने रावे गावात शिक्षणाची गंगा आली.विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थीनी देखील शिक्षण घेऊ लागल्या असे ग्रामस्थांनी सांगितले. चेअरमन आर बी पाटील ,
उपाध्यक्ष जी ए पाटील , मुख्याध्यापक एस आर शेंडगे, याचबरोबर मंचावरील उपस्थित काही ग्रामस्थ आणि मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. डॉ एम एस पाटील, अरुण पाटील, लता जांभळे डॉ प्रमिला माळी, घरत, याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ उपस्थित होते.यानंतर वर्षभरातील क्रीडा सामने, चित्रकला, हस्तकला, रांगोळी आणि विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना आणि विद्यार्थी प्रतिनिधी पारस पाटील आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी दिया पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षक, पालक आणि सर्व विद्यार्थी अभिनंदनास प्राप्त आहेत हे या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून दिसून आले.या कार्यक्रमाला विद्यार्थीनिंची उपस्थिती लक्षणीय होती .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे