pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील 35 स्वयं सहाय्यता बचतगटांची मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी लॉटरी पध्दतीने निवड

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.20

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत एकुण 35 मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येवून या अर्जाची छाननी करुन पात्र ठरलेल्या 99 बचतगटांपैकी उद्दिष्टानूसार लहान मुलींच्या हस्ते चिठ्या काढून लॉटरी पध्दतीने जिल्ह्यातील एकुण 35 स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंअंतर्गत लाभार्थ्यांच्या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदिप भोगले, समाज कल्याण अधिकारी दत्तात्रय वाघ, उपायुक्त वैशाली हिंगे, महात्मा फुले महामंडळाच्या व्यवस्थापक श्रीमती सी.ए.वाकोडे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक श्री.राठोड, कार्यालयीन अधिक्षक ए.बी.ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंतिम निवड झालेल्या 35 स्वयंसहाय्यता बचतगटामध्ये दक्षा दारिद्रयरेषेखालील महिला स्वयं सहाय्यता बचतगट जालना, त्रिशा बीपीएल स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, भिमाई माता महिला स्वयंसहाय्यता बचतगट सावरगाव ता.जि.जालना, बाळासाहेब शेतकरी पुरुष बचतगट सावरगाव, आनंद पुरुष बचतगट जालना, संत रोहिदास महाराज स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट बक्कालकुवा जालना, तथागत पुरुष बचतगट जालना, महाबोधी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट ढांबरी, सृष्टी मागासवर्गीय स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट इंदेवाडी, नारीशक्ती महिला स्वयंसहाय्यता बचतगट मानेगाव, संसार स्वयंसहाय्यता महिला बचतगट हिवरा रोषणगाव, कर्तव्य महिला स्वयंसहाय्यता बचतगट जालना, रुतुजा महिला स्वयंसहाय्यता बचतगट चितळी पुतळी, संगम स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट गवळी पोखरी, माता रमाई आंबेडकर स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट गवळी पोखरी, स्वप्निल स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट चंदनझिरा, सरिता स्वयंसहाय्यता महिला बचतगट चंदनझिरा, स्मित महिला स्वयंसहाय्यता बचतगट जालना, विनोद स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट, जनकल्याण पुरुष स्वयंसहाय्यता बचतगट जालना, संकल्प स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, अशोका स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, प्रगती स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, लहुजी स्वयंसहाय्यता महिला बचतगट जालना, सम्राट स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, लक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगट जालना, वैभव स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, धम्मज्योती स्वयंसहाय्यता महिला बचतगट बोधलापूरी, शल्यपुत्र मागासवर्गीय स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी शेतकरी स्वयं सहाय्यता बचतगट बोधलापूरी, माता भिमाई स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना, लहुवंश स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट मानेगाव, ओम स्वयंसहाय्यता बचतगट जुना जालना, आनंदराज स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट जालना आणि युवाशक्ती शेतकरी स्वयंसहाय्यता बचतगट अहंकार देऊळगाव यांचा समावेश आहे. निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचतगटामधील काही बचतगटांनी ट्रॅक्टर खरेदी न केल्यास उद्दीष्टपूर्तीच्या अनुषंगाने एकुण 5 बचतगटांची प्रतिक्षाधीन यादीमध्ये निवड करुन ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येकी 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून 10 टक्के लाभार्थ्यांना हिस्सा म्हणजे 35 हजार रुपये स्वत:ला भरावे लागणार आहेत. निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचतगटांची यादी केवळ या वर्षासाठीच वैध राहणार आहे. असे श्री.भोगले यांनी सांगितले. यावेळी पात्र बचतगटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4