पांगरी(नांदेड) येथे भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळ्या निमित्त ग्रंथ वितरण सोहळा संपन्न

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29
नांदेड पांगरी ता.नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड,महाराष्ट्र द्वारा गत सहा वर्षांपासून चालु असलेल भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या वर्षी सातव्या वर्षी संकल्पपूर्ती सोहळ्या निमित्त ग्रंथ वितरण सोहळा दि.२८ जुलै २०२४ पांगरी ता.नांदेड येथे अनेक भाविक संतांचा सत्कार करण्यात आला.
या वर्षीचे साधक पारायण करण्यासाठी बसणार आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत कारण आपला “ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक”(९०३३ ओव्या) हा संकल्प यावर्षी पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी यांनी प्रयत्न केल्यामुळे ९३९५ साधकांनी नोंदणी केली त्यां साधकांना घरपोच मोफत ग्रंथ वितरण करण्यासाठी पदाधिकारी ग्रंथ वितरण सोहळ्यात नांदेड सहित महाराष्ट्रातील तालुका पदाधिकारी उत्स्फूर्त पणे उत्साहात ग्रंथ वितरण करून दि.५ ऑगस्ट ते ९ सप्टे.२०२४ पर्यंत आपण आपल्या घरी आपल्या वेळेनुसार दिलेल्या ओव्याचे पारायण करून दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी सामुदायिक पारायण मामा मंगल कार्यालय मारताळा ता.लोहा येते सांगता सोहळ्यात सहभागी करावे कसे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरगेकर यांनी पदाधिकारी बैठकीत केले.
या बैठकीत आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य व जिल्हा तालुका पदाधिकारी यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वितरण सोहळात सहभागी झाले होते मार्गदर्शक रावसाहेब पाटिल शिराळे,दतराम पा यडके,दतराम पा गोरठेकर, सचिव व्यंकटराव पा जाधव माळकौठेकर सहसचिव प्रभाकरराव पुय्यड,अनिता ताई पतंगे, शिवाजीराव पांगरगेकर, गणेश पवार, शिवाजी मदमवाड, प्रविण महाराज रौतुलवाड, बालाजी, प्रभाकर पवळे,नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे पदाधिकारी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते
असे प्रसिध्दीपत्रक चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले