बँक ऑफ महाराष्ट्र नवघर समोर प्रज्वला ठाकूर करणार भिक मांगो आंदोलन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यावरील ३१ लाखांची रक्कम परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात नवघर येथे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेस यांच्या विरोधात दिनांक २२/४/२०२३ रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र पोलिसांमार्फत तसेच बँकेशी संबंधित विभागा मार्फत तपास संथ गतीने चालू आहे.आरोपी मात्र फरार आहेत. त्यांच्यावर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.तब्ब्ल ४ महिने उलटूनही भेंडखळच्या प्रज्वला ठाकूर यांना न्याय न मिळाल्याने दिनांक २८/८/२०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर समोर प्रज्वला ठाकूर हे भिक मांगो आंदोलन करणार होत्या मात्र पोलीस प्रशासनाने हे भिक मांगो आंदोलन करू नका. आम्ही काहीतरी तोडगा काढू असे सांगितल्याने प्रज्वला ठाकूर यांनी 28 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र बँक शाखा नवघर समोर करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. पोलीस स्टेशन मध्ये बैठक झाली तेंव्हा महाराष्ट्र बँकेचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही बँकेचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनातर्फे कोणतेही सकारात्मक व योग्य ते निर्णय मिळाल्या नसल्याने तसेच न्याय मिळण्यासाठी विलंब होत असल्याने झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भेंडखळ गावच्या पीडित महिला प्रज्वला ठाकूर हे सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर समोर भिक मांगो आंदोलन करणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र, नवघर शाखेसमोर सोमवार दिनांक २८/०८/२०२३ पासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिक मांगो आंदोलन करण्याचे मी ठरविले होते. परंतु, नवघर येथील बँक मॅनेजर तसेच श्री. चौरासिया व सौरभसिंग झोनल मॅनेजर नवी मुंबई तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस स्टेशन यांनी माझेसोबत चर्चा करुन पोलीस कार्यालयांत बैठक घेवून ५ दिवसांत आरोपींवर कारवाई करतो असे आश्वासन पोलीस स्टेशन येथून दिले. तसेच बॅकेच्या अधिका-यांनी तुमचे पैसे परत मिळवून देतो असे आश्वासन दिले. परंतु, आजपर्यंत मी वेळोवेळी याबाबतचा पाठपुरावा करुनदेखील तसेच सर्वांची वेळोवेळी भेट घेवून देखील कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याकारणाने मी सदरचे स्थगित केलेले भिक मांगो आंदोलन दिनांक ११/०९/२०२३ पासून माझे पूर्ण कुटुंब आणि नातलगांसहीत नवघर शाखेसमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिक मांगो आंदोलन करण्याचे ठरविले आहे.असे प्रज्वला ठाकूर यांनी सांगितले.