pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासनाच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 12

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.15 सप्टेंबर 2023 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यात 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कारासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पुरस्कारासाठी शासन निर्णय 4 जुलै 2023 च्या निकषांची पुर्तता करणाऱ्या अथवा करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अर्जाचा नमूना परिशिष्ट अ शासन निर्णयात समाविष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व सहभागी गणेशोत्सव मंडळामधून जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2