सिने अभिनेते आशिष सातपुते यांनी दुर्मिळ कलाकारांचे आवाज काढून गाठली कमी वयात यशाचं शिखरं…..

जालना/प्रतिनिधी, दि.19
आशिष सातपुते हे घाटकोपर ईस्ट मधे रमाबाई आंबेडकर नगर महात्मा जोतिबा फुले येथे आहे..जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हापासून तीन ते पाच वर्ष आशिष सातपुते कधी बोललेच नाहीत.. असं वाटलं आता पुढे काय होणार.. पण शेवटी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आशिष सातपुते बोलायला लागले.. घरात आई शालिनी सातपुते वडील पुंडलिक सातपुते आणि भाऊ सतीश सातपुते अस छोटंसं कुटुंब… शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत bmc शाळेत झालं. शाळेत असतानाच मुख्याध्यापिका शोभा जामगरे मॅडम होत्या.. त्यात त्यांना लेखनाची खूप आवड.. तिथून खरा त्यांचा प्रवास सुरू झाला. घरातच CD च व्यवसाय असल्यामुळे दररोज वेगवेगळ्या कॅसिटी घरात यायच्या.. त्यात पोट धरून हसा ही कॅसेट बघत बघत ते कॉमेडी करायला शिकले.. आणि रमाबाई आंबेडकर नगर मध्ये तरुण मित्रमंडळ येथे एका कार्यक्रमात भाग घेतला आणि तेव्हा दादा कोंडके आणि निळू फुले यांच्या आवाजाची मी नक्कल केली ती प्रेक्षकांना खूप आवडली आणि मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस देऊन रसिक प्रेक्षकांनी मला डोक्यावर उचलला.. आजूबाजूला चर्चा झाली की अहो हा तुमचा मुलगा किती छान कॉमेडी करतो हे तेव्हा माझ्या घरच्यांना कळलं.. आणि मग तिथून मी मकरंद अनासपुरे भरत जाधव, सयाजी शिंदे, बाबा चमत्कार,लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ राजकीय मध्ये आदरणीय शरद चंद्र पवार साहेब रामदासजी आठवले अजित पवार साहेब अशा बऱ्याच नकला करत करत रसिक प्रेक्षकांच्या घरात अभिराज्य केले.. लहान मुलांसाठी कार्टून आवाज देखील काढले आणि आज तब्बल 250 हून अधिक आवाज काढण्याचा रेकॉर्ड झाला.. सोबत काही मराठी मालिका सुद्धा केल्या. जसे की लक्ष,पंचनामा, राधा ही बावरी,चार दिवस सासूचे, ऐक अबोल मोहोर, माझ्या प्रियाला प्रित कळेना, लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमातून मी रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पडली. हा विचार केला की नकला करून पोट भरेल का तर मंन म्हटलं नाही.मग मी निवेदक बनलो, जादूचे प्रयोग शिकलो,साईबाबा ची भूमिका केली, होम मिनिस्टर कार्यक्रम करून भाऊजी बनलो.. अश्या विविध रूपात आलो..याच सर्व श्रेय रसिक प्रेषक आणि आई वडील…