pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

निवडणूक खर्च निरीक्षक सर्वना कुमार के. करणार  उमेदवारांच्या लेख्यांची तीन वेळा तपासणी

0 1 7 6 7 8

जालना/प्रतिनिधी,दि. 24

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  च्या अनुषंगाने 18-जालना लोकसभा मतदारसंघकरीता खर्च तपासणीसाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून सर्वना कुमार के. (आयआरएस) यांची नियुक्ती भारतीय निवडणुक आयोगाने केलेली आहे. उमेदवाराच्या प्रचाराच्या कालावधीत किमान तीन वेळा ते प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करतील. खर्च निरीक्षक यांना व्यक्तीशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे. निवडणुक प्रक्रियेमधील प्रत्येक तपासणीनंतर उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीच्या तारखेपर्यंत स्कॅन करण्यात येऊन निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करील. निवडणूक खर्च तपासणीसाठी पहिली तपासणी दि. 3 मे 2024, दुसरी तपासणी दि. 7 मे 2024 आणि तिसरी तपासणी दि. 11 मे 2024 याप्रमाणे तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. तरी सर्व लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी खर्च तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू सोळंके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 18 जालना लोकसभा मतदार संघात दि.13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म भरणे सध्या सुरु आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 (1) हे लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारांस ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख व निवडणुकीच्या निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह या दरम्यान त्याने केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) ठेवणे अनिवार्य आहे. उक्त खर्चाची एकूण रक्कम लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 (3) अन्वये विहीत करण्यात आली आहे. याच कलमान्वये विहीत केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खर्च करणे किंवा प्राधिकृत करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 123 (6) च्या संदर्भात भ्रष्ट आचारण आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे