pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या सोबत मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार निवारण बैठक संपन्न

0 1 7 3 9 9

जालना/प्रतिनिधी, दि.7

जालना दि.५ जुलै २०२३ रोजी दु. ४ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला पुणे गायकवाड यांच्यासोबत मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार निवारण बैठक संपन्न झाली यामध्ये विशेषतः १) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुलै २०२३ च्या वार्षिक वेतनवाढ मंजूर करतांना संबंधित कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तिकेवर त्या त्या कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन त्याची एक प्रत वेतन देवका सोबत सादर करणे २) वेतनवाढ मंजूर केल्या बाबतचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र देणे. 1) सेवानिवृत्त व इतर सर्व कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित राव ४ था हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात यावा व एनपीएस पारक कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्यात यावा, ४) प्रलंबित वैद्यकीय देयके ७ ते १५ दिवसात निकाली काढणे, ५) मागील दोन वर्षांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना देण्यात याच्यात ६) संयुक्त खात्यावर जमा झालेली वेतनाची रकम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर विनाविलंब जमा करण्यात यावे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कपातीचे हप्ते त्वरित त्या त्या खात्यावर जमा करण्यात यावे, ७) संयुक्त खाते है झिरो बॅलन्स से खाते असल्यामुळे सदर खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत मागणी करावी, ८) शासनाचे नेट बैंकिंग नुसार पगार करण्याचे आदेश असताना देखील मुख्याध्यापक चेक द्वारे बँकेकडे यादी देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब करतात त्यांना नेट बैंकिंग द्वारेच कर्मचान्यांचे वेतन करण्याचे आदेश द्यावेत,

९) मूळ सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, १० अंशतः अनुदानित शाळा वर्ग तुकड्या वरील कर्मचान्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे, ११) संस्थातर्गत होणाऱ्या बदल्या व पती-पत्नी एकत्रीकरण इत्यादींचे नियंत्रण करण्यात यावे, १२) नियमबाह्य केलेले वेतन कपात स्वतंत्र देयके तयार करून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. १३)८ जून २०२० च्या अधिसूचनेनुसार २४ मार्च २०२३ रोजी निघालेल्या राजपत्रात झालेल्या दुरुस्ती प्रमाणे प्रत्येक शाळेतीत कार्यरत कर्मचान्यांची सेवाजता पादी तयार करून नियमाप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना पदोन्नती देण्यात यावी त्याशिवाय जुलै २०२३ वेतन देयके स्वीकारण्यात येऊ नये २५ मार्च २०२३ च्या राजपत्राची प्रभावी अंमलबजावणी करावी, १४) अपघात विमा, अर्जित रजा कर्मचाऱ्यांनी सेवेत कार्यरत असताना प्राप्त केलेली वाढीव शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता • सेवांतर्गत प्रशिक्षण याची नोंद वेळच्या वेळी सेवापुस्तकेत घेणे, १५) कार्यालयीन कामासाठी शिक्षकांऐवजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाठविण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, १६) वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करणेबाबत संस्था स्तरावर होणारी कर्मचाऱ्यांची अडवणूक थांबवावी त्यासंबंधीचे प्रस्ताव संस्था यांच्याकडून मंजूर करून घेऊन शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात यावे, १७) समायोजित कर्मचाऱ्यांना संस्थास्तरावर रुजू करून घेण्यासाठी मुख्याध्यापकांना आदेशित करणे, १८) इंग्रजी माध्यम स्वयं अर्थसहाय्यीत शाळेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सर्व लाभ देऊन वेतन अदा करण्यासाठीच्या सूचना आदेश संस्थाप्य व सचिव यांना देणे, १९) संस्था अध्यक्ष व सचिव यांच्याकडून कर्मचाऱ्यांची होणारी वेठबिगारी थांबवावी, २०) कला शिक्षकांना ए एम ही पदवी धारण केल्यानंतर पदवीपर वेतन श्रेणी दण्यात यावी व एकाच वेतन श्रेणीत बारा ये पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणीचा लाभ दिव्यात याचा या व इतर मागण्यांसाठी विवि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निवेदन मराठवाडा शिक्षक संघाकडे दिले होते मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन श्रीमती मंगलाताई धुपे गायकवाड यांनी दिले यासोबतच विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणे संदर्भात चर्चा घडवून आली यामध्ये शालेय उपक्रम अंतर्गत एक मूल एक झाड राबवण्याची संकल्पना मा शिक्षणाधिकारी यांनी मांडली यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय स्तरावर रोपवाटिका तयार करण्यासाठीची स्पर्धा घेण्यात येईल यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शाळेस १०००० रु द्वितीय क्रमांक ७००० रु. तर तृतीय क्रमांक ३००० असे बक्षीस वितरण करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे गायकवाड यांनी माहिती दिली यावेळी वेतन पथक भविष्य निर्वाह निधी कार्यालय जालनाचे कर्मचारी के के शेख, पी के जोगदंड वरिष्ठ सहाय्यक जिप जालना, मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सदस्य प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, सचिव संजय येळवंते, उपाध्यक्ष जगन वाघमडे, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, सहसचिव प्रद्युम्न काकड, प्रसिद्ध प्रमुख हकिम पटेल इ. पदाधिकारी व समस्याग्रस्त, अन्यायग्रस्त, पीडित, वंचित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे