pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण पोलिसांच्या मदतीने मोठी जुई येथील 5 एकर जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न.

जमिन खरेदी, विक्रीत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक.

0 1 7 3 8 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

उरण तालुक्यातील मोठी जुई येथील मूळ स्थानिक असलेल्या शेतक-यांची 5 एकर जमीन जबरदस्तीने बळकविण्याचा प्रयत्न सुरु असून 5 एकर जमिनीचा भाव अंदाजे 400 कोटी असून हे जमीन 1989 साली दोघा शेतकऱ्यांना एकूण 27000 रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने जबरदस्ती करून शेतकऱ्यांवर जमीन देण्यास दबाव टाकला जात आहे.त्यामूळे संतप्त शेतकऱ्यांनी गावठाण चळवळीचे नेते राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत या विरोधात लढा उभारत प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

उरण तालुक्यात अनेक नवनविन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्प येत आहेत.त्यामुळे महत्वाच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या जमीनी कवडीमोल भावाने संपादित करण्यात येत आहेत. नंतर याच संपादित केलेल्या जमिनी नंतर करोडो रुपयाने विकून जमिनी बिल्डर, उद्योगपतीच्या अशात घातले जात आहे. जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा, अशिक्षितपणाचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. व यातून शेतक-यांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे उरण मध्ये असे अनेक प्रकार होत असून नुकताच उरण तालुक्यातील मोठी जुई येथील जमीन प्रकरणाचा वाद समोर आला आहे.1989 साली कमलेश छोटालाल पारेख, राहणार मुंबई यांनी मोठी जुई येथील जमीन विकत घेतली तेव्हा कोणतेही खरेदी खत किंवा रजिस्ट्रेशन न करता एका व्यक्तीला पंधरा व दुसऱ्या व्यक्तीला 12 हजार रुपये दिले. मात्र कागदोपत्री तसा व्यवहार कुठेही झाला नाही. केवळ तोंडी हा व्यवहार झाला मात्र शेतक-यांनी आपल्या पिकत्या जमिनीचा ताबा पारेख यांना कधीच दिला नव्हता. 1989 पासून कमलेश पारेख मोठी जुई येथे एकदाही आले नाही किंवा त्यांनी शेती केली नाही. 1989 पासून गावातील स्थानिक रहिवाशी ही शेती करत आले आहेत. कसेल त्याची जमीन या महाराष्ट्र कायद्यान्वये कुळ कायदया नुसार जो शेती करेल त्याची त्या जमीनीवर मालकी हक्क प्राप्त होते. 1989 सालो पासून गावकरी शेती करत आल्याने शेतकऱ्यांनी सदर 5 एकर जमिनीवर मालकी हक्काचा दावा केला आहे. तसेच ही जमीन कोणालाही विश्वासात न घेता विवेक ज्ञानेश्वर पाटील,राहणार तुर्भे,नवी मुंबई यांना कमलेश पारेख यांनी परस्पर जमीन विकली आहे. विवेक ज्ञानेश्वर पाटील यांचा शेतीशी किंवा त्या जागेशी कोणताही संबंध नाही असे असताना पोलीसांना हाताशी धरून जमीन ताब्यात घेण्याचा बेकायदेशीर प्रकार समोर आला आहे. या अन्याया प्रकरणी सर्व पिडित शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्त नवी मुंबई, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य, कोकण आयुक्त, लोकायुक्त,मानवी हक्क आयोग, ई.डी, मा. उच्च न्यायालय आदी ठिकाणी पत्रव्यवहार देखील केला आहे. विवेक पाटील यांच्या कडून जमीन संपादना साठी वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यांच्या दबावा खाली येऊन उरण पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्ग पिडित शेतकऱ्यांचा मानसिक छ्ळ करत असल्याचा आरोप गावठाण विस्तार चळवळीचे नेते राजाराम पाटील व ग्रामस्थांनी केला आहे. योग्य न्याय न मिळाल्यास शेवटी आमरण उपोषण करण्याचा निर्णय पिडित शेतकऱ्यांनी घेतला आहे. जमिनी विकत नसल्याने तसेच अज्ञानाचा फायदा घेत शेतक-यांची कोणतेही चूक नसताना देखील जमीन संपादनासाठी भादवी कलम 141,447, 141, 145,147 149 अन्वये शेतकऱ्यांवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. केवळ जमीन देत नाहीत म्हणून पोलीस प्रशासनातर्फे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीचे शेतकऱ्यांच्या जमिनीत मातीचे भराव सुरु असते. तहसीलदार किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हे काम सुरु आहे. त्यामुळे मोठी जुई गावातील पीडित शेतकरी संतप्त झाले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे