pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते वितरण व मार्गदर्शन

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि.7 

औरंगाबाद विभागातील स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप त्याचबरोबर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत विधवा महिलांना सातबारा आणि आदेशाचे वितरण समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद येथे दि. 8 जुन 2023 रोजी करण्यात येणार आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि समान संधी केंद्रांचे प्रतिनिधींना विविध शैक्षणिक योजनांबाबत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबाद अंतर्गत 51 शासकीय वसतिगृहे आणि 11 शासकीय निवासी शाळा कार्यरत असून गृहप्रमुख, गृहपाल, मुख्याध्यापक यांच्या कार्यशाळेस व कामकाज पद्धतीबाबत आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांच्या वतीने अनुसूचित जातीच्या एमपीएससी, युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकेचे उद्घाटन आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही होणार आहे.
लातूर, औरंगाबाद, अमरावती व पुणे विभागातील अधिकाऱ्यांची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबत आणि विद्यार्थी वसतिगृह प्रवेशाबाबत व योजनांचा आढावा बैठक संपन्न होणार आहे. अल्पसंख्यांक लाभार्थ्यांच्या प्रश्नाबाबतही चर्चा होणार आहे व 1 हजार मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.1,2,3, संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृह, किले अर्क, औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. तसेच शुक्रवार दि.9 जुन 2023 रोजी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिव यांची आढावा बैठक घेणार असून त्याच दिवशी मातंग समाज, चर्मकार समाज तसेच अंधश्रद्धा निर्मुलन निगडीत संघटनांच्या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2