pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार…भाजपा नेते सतीश घाटगे

चापडगाव हे गाव समृध्दी साखर कारखान्याने घेतले दत्तक

0 1 7 3 9 9

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.26

शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे.शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर देशाला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू केला पाहिजे.त्याशिवाय प्रगती होणार नाही.शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडून न जाता सक्षमपणे उभा रहाव.शेतकऱ्यांच्या पाठीशी हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहील,असे आश्वासन भाजप नेते सतीश घाटगे यांनी दिले.

घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या शाखा उद्घाटन व शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी घनसावंगी विधानसभा प्रमुख विश्वजीत खरात,गणेश पघळ,उपसभापती अरुण घुगे,गोविंद ढेंबरे,योगेश देशमुख,विठ्ठल अटकळ,विलास होंडे,राजकुमार उगले,आबासाहेब लोंढे,शेषराव बोरुडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना घाटगे म्हणाले की,शेतकऱ्यांनी ऊस लावला तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होत आहे.ऊस हे नगदी पीक आहे.तुम्ही ऊस लावा तो ऊस घेवून जाण्याची जबाबदारी ही समृध्दी साखर कारखाना घेईल.तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय सुरू करा.लवकरच दूध डेअरी सुरू केली जाईल.

चापडगावातील एकजूट पाहून समृध्दी साखर कारखाना हे गाव दत्तक घेत आहे.गावातील ज्या काही छोट्या मोठया अडी अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.या गावाला विकासाचे उत्कृष्ट नमुना म्हणून पुढे घेवून जाऊ.गावकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवून कायम सोबत उभा रहाव,असे ते म्हणाले.

यावेळी मार्गदर्शक आबासाहेब हारबळ,भद्रिनाथ निचळ,प्रभाकर धांडे,शेषराव बोरुडे,संतोष हारबळ,गणेश हारबळ,बाबासाहेब हरबक,वाल्मीक हरबक,डिगांबर निचळ,कैलास हरबक,बाळु काळे,अमोल टकले,अमोल हरबक, कृष्णा हरबक,हनुमान हरबक व चापडेश्वर समितीचे सर्व सदस्य,ग्रामपंचायत,सोसायटी सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे