pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लिखाण करणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज – मा राज्य मंत्री बदामराव पंडित

पत्रकारांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राधान्य द्यावे -: रणवीर पंडित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

0 3 1 2 8 4

गेवराई /प्रतिनिधी,दि.07

६ जानेवारी मराठी पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच दर्पणदिन यानिमित्त संपूर्ण राज्यभरासह गेवराई तालुक्यामध्ये देखील साजरा करण्यात आला. या मध्ये निर्भीड पत्रकार संघ गेवराई तालुका संघाच्या वतीने दर्पणदिन सोहळ्याचे आयोजन करण्यातआले होते.
गेवराई शहरातील जि. प. शाळा नं २ येथे निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने दि.06 जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर अर्थात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, नायब तहसीलदार संजय सोनवणे, युवा नेते रणवीर पंडित, पोलीस उपनिरीक्षक राम खोत, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मोरे,यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली.विद्यार्थाना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच सा.गेवराई संघर्ष योद्धा या दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा करण्यात आला. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्भीड पत्रकार संघाची तालुकाध्यक्ष अमोल कापसे यांनी केले गेल्या पाच वर्षापासून चा निर्भीड पत्रकार संघाच्या कार्याचा लेखाजोखा यावेळी त्यांच्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये मान्यवरांसमोर मांडला.तर आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री बदामराव पंडित हे म्हणाले की आपल्या समाजातील प्रत्येक घटकाच्या अडी- अडचणी आणि प्रश्न आहेत. ते सोडून घेण्यासाठी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे आजही जनहितासाठी लिखाण करणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज आहे. त्यामुळे सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांच्या योगदानाची गरज असल्याचेही माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सांगितले.तर
शारदा स्पोर्ट अकॅडमी चे संचालक तथा युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांच्यातील शारीरिक कौशल्य पाहता क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी मी शारदा स्पोर्ट अकॅडमी च्या माध्यमातून कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गोष्टींना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे. तसेच जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर त्या मांडण्यासाठी आपल्या पेपर मधील दोन कॉलमची जागा ही शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी राखीव ठेवावी असे आवाहन यावेळी युवा नेते रणवीर पंडित यांनी पत्रकारांना केले. तर नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी आपल्या मनोगत पर भाषणामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर पत्रकार हा समाजाचा दर्पण म्हणजेच आरसा आहे. त्यांनी पारदर्शकपणेच काम करावे असा सल्ला त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला. यावेळी व्यासपीठावर परमेश्वर महाराज वाघमोडे, पोलीस मध्ये उपनिरीक्षक राम खोत,माजी सैनीक अरुण परदेसी, तलाठी अशोक काटे,यांनी देखील आपले विचार मांडले तर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रमा ची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन दैनिक लोक मंथन चे तालुका प्रतिनिधी उद्धव काळे सर यांनी केले तर निर्भीड पत्रकार संघाचे औदुंबर खेडकर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल कापसे, तालुका उपाध्यक्ष सलमान शेख, तालुका सचिव बाळासाहेब घाडगे, शहराध्यक्ष सतीश वाघमारे, असलम कादरी, सय्यद गफ्फार,भाऊसाहेब नाटकर, गजानन संभाहारे,अशोक मोरे,समीर सौदागर, भाऊसाहेब महानोर, प्रदीप गाजरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा नंबर 2 च्या मुख्याध्यापिका स्वाती मोरे, शिक्षक जितेंद्र दहिफळे, शिक्षक देशमाने, कालिदास,बहिर रतन,ननवरे शारदा,देवकर ताराबाई,वाटोरे बेबीनंदा, देवढे वर्षा, काळे स्वाती यांनी विशेष सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे