pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा शिक्षक आघाडीच्या मराठवाडा विभाग संयोजक– पदी -संजय भातलवंडे

मराठवाड्यात शिक्षक आघाडी मजबूत करणार

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.13

भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक,माजी महापौर प्रा.डॉ.कल्पनाताई पांडे यांनी मराठवाडा विभागीय संयोजक म्हणून संजय भातलवंडे यांची नियुक्ती केली असून नियुक्तीचे पत्र त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री भातलवंडे बोलत होते,घोषित,अघोषित व मूल्यांकनास पात्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान भारतीय जनता पार्टीचे व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवणीस यांनीच अनेक शिक्षक हिताचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार.
आज माझ्यावर पक्षाने जिम्मेदारी दिल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी मराठवाडा विभागात शिक्षक आघाडीची संघटना बांधणीसाठी आपण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील 76 तालुक्यात व चार महानगरातील 32 प्रभाग रचने पर्यंत शिक्षक आघाडीची संघटना बांधणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार.
मराठवाड्यातील शिक्षकाचे ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडून घेण्यासाठी आपण राज्य संयोजक प्रा. डॉ.कल्पनाताई पांडे यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी मांडून ते सोडून घेण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपा शिक्षक आघाडीच्या मराठवाडा विभाग संयोजक पदी श्री भातलवंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2