pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ   निवडणूक निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंगरूमची पाहणी  

परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे दिले निर्देश

0 1 7 9 1 0

जालना/प्रतिनिधी,दि. 4

जालना लोकसभा मतदारासंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (जनरल) शैलबाला अंजना मार्टीन यांनी शुक्रवारी (दि.3) जालना एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध बाबींची तपासणी करून केलेल्या योग्य नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कौतुक केले. मतदान यंत्र या स्ट्राँगरुममध्ये ठेवल्यानंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा स्ट्रॉंग रूम नोडल ऑफिसर सोहम वायाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक श्री. राजपूत हे उपस्थित होते.

श्रीमती मार्टीन यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे स्ट्राँगरूममध्ये सर्व व्यवस्था असल्याची पाहणी करून खात्री केली. स्ट्राँगरुम म्हणून निवड केलेला परिसर सुरक्षित करण्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्वांसोबत त्यांनी चर्चा करून सर्व नियोजन व्यवस्थित करण्याची सूचना केली. सुरक्षा व्यवस्थे संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करून पुढील कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. मतमोजणी केंद्रावर सुरळीत विद्युत पुरवठा, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्नीशामक दल, स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याचे पाणी या सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या.

जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि इतर साहित्य एम.आय.डी.सी. येथील सरस्वती ऑटो कॉम्पोनेटस येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित ठेवण्याकरीता आणण्यात येणार आहे. या ठिकाणी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रावरील स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, ईटीबीपीएस / टपाली मतपत्रिका मोजणी कक्ष, निवडणूक निरीक्षक यांचे कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, टॅब्युलेशन कक्ष, मिडीया कक्ष, वाहन पार्किंग व्यवस्था तयार करणे व ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची सुरक्षा व्यवस्था इथे करण्यात येणार असल्यामुळे याकामी असलेल्या यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश श्रीमती मार्टीन यांनी दिले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे