जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेडा फिरंगी येथे आज जिल्हा युनायटेड ग्लोबलर फेडरेशन तर्फे बॅग वाटप

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.11
परिषद शाळा वरखेडा फिरंगी जाफराबाद जालना येथे युनायटेड ग्लोबल फेडरेशन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता १ ते 5 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकवर्गाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर युनायटेड ग्लोबल फेडरेशन चे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर दुर्गेश विष्णू बनकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे हीच संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे.
बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले शाळेच्या मुख्याध्यापकांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उर्मी वाढते आणि शिक्षणाबद्दलची ओढ टिकून राहते.
कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालकवर्ग तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
समारोपाच्या वेळी सर्व उपस्थितांनी “शिक्षण हाच सर्वोत्तम दान” या भावनेने अशा उपक्रमांना पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.



