pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चालु वर्षातील सण, उत्सव व उपक्रमामध्ये ध्वनीची विहीत मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी

0 1 7 4 1 6

जालना/प्रतिनिधी,दि.7 

जिल्ह्यात सन 2024 मध्ये विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण,उत्सावाच्या काळात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी  सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि. 27 ऑगस्ट 2024) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दि. 7 व 17 सप्टेंबर रोजीचे 2 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील नवमी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर रोजी, जिल्हास्तरीय महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमासाठी दि.13, 16 व 17 फेब्रुवारी 2024 रोजी आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव एक दिवस अशी सुट जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे