pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंचेली येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा पन्नासावा अखंड हरिनाम सप्ताह व आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा बोर्डाचे अनावरण 

0 1 7 4 1 6

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.14

नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण सोहळा दि11फ्रेबु. 2024रोजी सांय.चार वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल,ता.अध्यक्ष स़ोपान गिरे,बालासाहेब येरबडे, जि.कोषाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार नायगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, ,सर्व पदाधिकारी तसेच सर्व शाखा पदाधिकारी, गावकरी, परिसरातील भक्त परिवारात नामघोषेत संपन्न.
गावकऱ्याच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष हभप प.पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञानामृत वाणीतून आम्ही वारकरी परिवार ही संकल्पना स्पष्टपणे मांडताना घरोघरी ग्रंथ ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा,अनेक संतांचे ग्रंथाचे पारायण,किर्तनाची ओढ निर्माण व्हावी,धर्माच्या रक्षणासाठि गाव तिथे शाखा निर्माण करून गावातील व्यसनाकडे जात असलेल्या तरून वर्गाला ईश्वराची आवड निर्माण व्हावी या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षापुर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आप आपल्या घरी आपल्या वेळेनुसार पारायण करता यावे म्हणुन छतीस दिवस दररोज फक्त पन्नास मिनिटांच्या वेळ ईश्वर सेवेसाठी मिळावा म्हणुन सहा वर्षापुर्वी फक्त बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केलेले ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण यावर्षी ते सहा हजार सातशे पन्नास साधक जोडले गेले. तर येणाऱ्या श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीमधील जेवढ्या ओव्या तेवढे साधक करण्याचा संकल्प केला आहे. तसेच पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवाराची धर्मशाळा उभारण्याबाबत माहिती या कार्यक्रमात दिली जानार आहे .तरी सर्व भाविक भक्तांनी धर्माच्या रक्षणासाठी
आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून घेण्यासाठी संतसंग हाच खरा मार्ग आहे..जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्तीची वृध्दी करून जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे..
धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेत सहभागी होण्यासाठी सर्व सदभक्तानी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे हभप राम महाराज यांनी केले.व रात्री आठ ते दहा हभप किर्तनाने अनेक भाविक भक्त तल्लीन झाले.
जि.प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल, जि.प्रसिध्दी कोष अध्यक्ष रामप्रसाद चन्नावार
नायगाव तालुका अध्यक्ष सोपान गिरे शंकर आकले बाबुराव कोलगने,संतोष कदम, जि. यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी शेकडो भक्त सहभागी होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ता नायगाव ता.सचिव बालासाहेब यरबडे,शा.अध्यक्ष लक्ष्मणराव भुरे, राचप्पा जिरंगे,शिवा पा.डाकोरे,शंकर भुरे,नागोराव ईबितदार,मारोती बोयाळ,जीवन डाकोरे,ज्ञानेश्वर शिंपाळे,ब्रम्हानंद व्होनराव,राजेंद्र व्होनराव,नागोराव बोयाळ, भगवान शिंपाळे,इंदुबाई बसवदे,विमल जिरंगे,सुरेखा शिंपाळे,उज्ज्वला जिरंगे,इंदुबाई मठवाले,सर्व शाखेतील पदाधिकारी परिश्रमाने कार्यक्रम यशस्वि केले असल्याचे माहिती आम्हि वारकरी परिवार जिल्हा प्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाक़ोरे पाटिल यांनी दिले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे