pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

0 1 1 8 3 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.3

गुरू पौर्णिमे निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे  गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून शाळेतील शिक्षक शिक्षिका व शालेय पोषण आहार कामगार यांचा शाल श्रीफळ व पेन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे ,मोल आयुष्याचे जाणून घ्यावे,गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे ,चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे म्हणून
गुरु पौर्णिमेच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाचा आदर प्रणाम. मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो तो म्हणजे शिक्षक कारण भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती काहीतरी आशा पद्धतीने गायली गेली आहे.गुरू चा आदर सत्कार व्हावा म्हणून
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील मुख्याध्यापक श्री गणेश तावडे सर,शिक्षक भगवान कांबळे श्री किशन आहीले , श्री शेख सर, श्रीमती नवाडे मॅडम, श्रीमती चिभडे मॅडम, तसेच श्री अंबादास तिव्हाळे, श्रीमती धुरपताबाई मुलगीर, श्रीमती आशाबाई डोंगरदिवे यांचा गुरू पौर्णिमे निमित्त सत्कार केला
डॉ भगवानराव निळे, सौ लताताई निळे माजी पंचायत समिती सदस्या हदगाव, शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष गजानन सुकापुरे,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन शहर अध्यक्ष हदगाव श्री निरंजन दहेकर यांच्यातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथील शिक्षक, शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका,व विद्यार्थी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4