कडकडीत उन्हातही हिवरापहाडीत ७०.१३% मतदान

बीड/प्रतिनिधी,दि.15
बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथे लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडली आहे, हिवरपहाडीत 2350 एवढे
एकूण मतदान आहेत पैकी 1667 एवढ्या मतदारानीं मताधिकार बजावला आहे. यात बूथ क्र.१,मतदार 910 तर बूथ क्र.२,मतदार 730 एवढ्या आहेत. एकून 70.93% मतदान हिवरपहाडीत झाले आहे. विशेषतः हिवरपहाडीचा मताधिकाराचा टक्का वाढला आहे. यावरून असे समजते आहे कि, येथील नागरिक जागरूक झाले आहेत. येथील जिल्हा परिषद प्राथमिक
केंद्र शाळेच्या या 2 हॉल मध्ये 2 मतदान बूथ व्यवस्था होती. या ठिकाणी एकूण २ बूथ वर मताधिकार प्रक्रिया पार पडली.
हिवरपहाडी संवेदनशील गाव,असल्याने कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैणात केला होता. भर उन्हातही मतदारानीं मताधिकाराचा हक्क बजावला.