pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भराडखेडा येथे अतिवृष्टीने सोलर पंपाचे नुकसान

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6

ऑक्टोबर महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे जाफराबाद तालुक्यातील भराडखेडा येथील शेतकरी शिवाजी गावंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीने याची भरपाई देण्याची मागणी श्री गावंदे यांच्यासह करणी केली आहे.ऑक्टोबर महिन्यात सिपोरा अंभोरा,भारडखेडा, सोनखेडा आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. सिपोरा अंभोरा शिवारातील गट क्रमांक ३९० मध्ये शिवाजी गावंदे यांच्या शेतातील विहिरीवर शासकीय योजनेतून स्पॅन कंपनीचे सोलर पंप बस आला होता.वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीने सोलर पंप च्या प्लेट उडून गेल्या असून फुटल्या आहेत. याविषयी ग्रामपंचायत ने पंचनामा केलेला आहे.तरी कंपनीने सोलर पंप च्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी श्री गावंदे यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे