भारतीय जनता पार्टी जालना महानगर चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर!
विकास कामे शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवा - भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी,दि 20
भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यात महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी श्री.संजय डोंगरे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानुरे यांचा समावेश आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हा कार्यालयात रविवारी (ता.२०) जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे यांच्या हस्ते नवनियुक्त मंडळ अध्यक्षांना नियुक्ती पत्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य विजय कामड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, अर्जुन गेही, डॉ.श्रीमंत मिसाळ, प्रा.राजेंद्र भोसले, वसंतराव शिंदे, सौ.अरुणाताई जाधव, विष्णू डोंगरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना श्री.भास्करराव पाटील दानवे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा शहरातील नागरिकांपर्यंत पोहचवून आपल्या मंडळात पक्ष संघटन बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.
महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे काम जालना शहरातील प्रत्येक वार्डात पोहोचवून जालना महानगरपालिकेवर भाजपा महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले यांनी केले तर वसंत शिंदे यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान निवडीची घोषणा होताच पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन मंडळ अध्यक्ष निवडीचा जल्लोष साजरा केला.