वादळी चक्रीवादळामुळे जातेगाव टेंभी कौटगाव मध्ये मोठ्या प्रमाणात फळबागाचे नुकसान

वैजापूर/जितेंद्र ठेंग,दि.6
मौजे कौटगाव येथील प्रगतशील शेतकरी देविदास राजाराम ढवळे यांच्या पपई बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अचानक आलेक्षल्या चक्रीवादळामुळे वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे कौटगाव व पंचक्रोशी मध्ये मोठे मोठे झाडे पडली व काहींचे कांद्याचे शेड उडाले काही प्रमाणात कांदा चाळीचे नुकसान झाले काही शेतकऱ्यांचे पत्रे उडाली कौटगाव येथील शेतकरी देविदास ढवळे यांनी त्यांच्या शेतामध्ये एक हजार दोनशे1200 पपईचे झाडे लावली होती उत्कृष्ट पद्धतीचे नियोजन करून बाग एकदम चांगल्या प्रकारे पपईचे फळे आली होती सरासरी एका झाडाला 50 किलो फळे होती शेतकऱ्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आसपास शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहे सदरील माहिती मिळताच कृषी सहाय्यक श्री आहेर साहेब तसेच जातेगाव टेंभी कौटगाव येथील तलाठी त्रिभुवन साहेब तसेच तंटामुक्त अध्यक्ष सुनील दादा पवार सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तात्या दुशिंग तंटामुक्त अध्यक्ष माधव नाना दुशिंग मुस्तफा भाई विकास ठेंग व इतर गावातील व्यक्ती यांनी प्रत्यक्ष भेट दिली व पंचनामासाठी वरील अधिकारी व ग्रामस्थ हजर होते