काजळा येथे अखंड हरिनाम सप्ताहास आज सुरुवात.

काजळा/प्रतिनिधी, दि 18
काजळा व काजळा परिसरातील सर्व धर्मानुरागी तथा भाविक जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, सध्याच्या अस्थिर युगामध्ये अधोगतीच्या मार्गाने वाढत जाणाऱ्या मानव जातीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी संताच्या शिकवणुकिची नितांत गरज आहे. समाजात प्रेमवृद्धी, सहिष्णुता आणि सात्विकता वृद्धिगत व्हावी यासाठी श्रीक्षेत्र काजळा येथे श्री संत भडंगनाथ बाबा यांच्या पुण्यातिथी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रम्हांडनायक पांडुरंग परमातम्याच्या कृपेने व श्री संत रघुनाथ बाबा, ज्ञानानंद बाबा, मारोती महाराज कुरेकर (बाबा), धर्मभुषण वै.गु. विष्णु म. कव्हळेकर, व वै.गु.नाना म. बुटेगांवकर यांच्या आशिर्वादाने व श्री. ह.भ.प. किसन म. जाधव यांच्या प्रेरणेने दि.18/01/2024 गुरुवार ते 25/01/2024 गुरुवार पर्यंत अंखड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. या सप्ताहात खालील कार्यक्रम दररोज होणार आहे
काकडा भजन,विष्णुसहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,रामायण,प्रवचन संध्याकाळी हरिपाठ व रात्री 8.30 ते 10.30 वा कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे
या सात दिवसात खालील कीर्तनकार यांची सेवा होणार आहे गुरुवार, दि.१८.०१.२०२४
श्री.ह.भ.प. आत्माराम म. शाखी आळंदी देवाची,
शुक्रवार दि.१९.०१.२०२४ जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान श्री. ह.भ.प. कान्होबा म. देहुकर श्री क्षेत्र पंढरपुर,शनिवार दि.२०.०१.२०२४ भागवताचार्य श्री. ह.भ.प. उमेश म. दशरथे आळंदी देवाची,रविवार दि.२१.०१.२०२४ बेदांताधार्य ह.भ.प.एकनाथ म. चत्तर शास्त्री परभणीकर,सोमवार, दि.२२.०१.२०२४
श्री. ह.भ.प. दत्तात्रय म. फरांदे वारकरी महामंडळ पुणे जि. उपाध्यक्ष,मंगळवार दि.२३.०१.२०२४
श्री. ह.भ.प. डॉ. रविदास म. सिस्साट (MA.Ph.D.Philosophy) आळंदी देवाची,बुधवार दि.२४.०१.२०२४ श्री.ह.भ.प. अशोक म. जाधव जुधरकर,गुरुवार दि.२५.०१.२०२४ ह.भ.प. केशव म. उखळीकर परळी वैजीनाथ यांचे स.१० ते १२ काल्याचे कीर्तन होईल
तरी पंचक्रोशीतील गावातील सर्व भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा, आणि तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.