pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आतापर्यंत 10 उमेदवारांनी 16 नामनिर्देशन पत्र केले दाखल ; आज 24 नामनिर्देशन पत्रांची विक्री

0 1 7 5 5 0

जालना/प्रतिनिधी,दि.23

18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 11 जणांनी 24 नामनिर्देशन पत्र खरेदी केले.  आज दि. 23 एप्रिल अखेर उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी एकूण 88 जणांनी 210 फॉर्म घेतले. आज 6 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 10 उमेदवारांनी 16 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

आज रावसाहेब दादाराव दानवे यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने 1 नामनिर्देशन पत्र, भास्कर बन्सी मगरे-अपक्ष 1, राजेंद्र नामदेव मगरे-अपक्ष 1,  दिपक भिमराव बो-हाडे-अपक्ष 1, तानाजी तुकाराम भोजने-अपक्ष 1, रतन आसाराम लांडगे-अपक्ष 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे