pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वेश्वि येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले

0 3 8 6 5 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

पी. पी. मुंबईकर विद्यालय, वेश्वि येथे दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे यांच्या आरोग्य केंद्र समिती व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या शिबिरात इनव्हीजन आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटर च्या नेत्र तज्ज्ञांनी सहभाग घेतला. प्रमुख नेत्रतज्ज्ञ डॉ. अमीषा ठाकूर, सहाय्यक जानवी पोपेटा आणि रिहॅब सय्यद यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक सल्ला दिला. काही विद्यार्थ्यांना चष्म्यांची गरज असल्याचे निदान झाले.

या शिबिरातून एकूण ११० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्याध्यापक माध्यमिक विभाग प्रितम टकले आणि मुख्याध्यापक प्राथमिक विभाग तृप्ती म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.

उपक्रमाचे यशस्वी आयोजन पी. टी. भोये (अध्यक्ष, आरोग्य केंद्र समिती) यांच्या पुढाकाराने तसेच प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर (वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक वर्गाने या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहते आणि नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते. भविष्यातही असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे