
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
भगत ब्रदर्सच्या सौजन्याने मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने उरण मध्ये आयोजित करण्यात आले होते. या सामन्यातुन आलेल्या नफ्यातुन सामजिक बांधीलकी म्हणुन समाजकार्याची अखंड परंपरा जोपासत भगत ब्रदर्स ग्रुपच्या वतीने रा. जि.प. शाळा खोपटेतील ई. १ ली ते ई. ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहीत्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी भगत ब्रदर्स परिवाराचे मिथुन निळकंठ भगत,मनिष भगत,श्रेयश भगत पिंकेश भगत,जितेंद्र भगत,मिलिंद भगत,महेद्रं भगत व मित्र परिवार उपस्थित होते.यापूर्वी भगत ब्रदर्स परिवाराने आपल्या परीने छोटे मोठे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.या वर्षि प्रथमच क्रिकेट स्पर्धेतून मिळालेली रकमेतून (नफ्यातुन)शैक्षणिक साहित्य वाटपचा कार्यक्रम त्यांनी केला आहे.भगत ब्रदर्सने केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून असे सामाजिक कार्यक्रम क्रिकेटच्या नफ्यातून सर्वत्र झाले पाहिजेत अशी भावना जनतेनी व्यक्त केली आहे.