पालकमंत्री अतुल सावे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी,दि.25
महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शुक्रवार दि.26 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमानूसार शुक्रवार दि.26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन, सकाळी 9.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून ध्वजारोहण स्थळाकडे प्रयाण. सकाळी 9.15 ते 9.45 वाजेपर्यंत ध्वजारोहण, राष्ट्रगीत व राज्यगीत, ध्वजस्तंभास सलामी, परेड निरीक्षण, शुभेच्छा संदेश, परेड संचलन व चित्ररथ संचलन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 ते 9.55 वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार व इतर कार्यक्रम. सकाळी 9.55 ते 10.05 वाजेपर्यंत जिल्हा वार्षिक योजना 2023-24 मधून पोलिस विभागासाठी खरेदी केलेल्या 29 चारचाकी व पोलिस महासंचालक यांच्याकडून प्राप्त 15 दुचाकी अशा एकुण 44 वाहनांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करतील. सकाळी 10.05 ते 10.15 वाजेपर्यंत उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व इतर मान्यवर यांच्या भेटी व स्वातंत्र सैनिक यांचा सत्कार करतील. सकाळी 10.15 ते 10.45 या वेळेत ध्वजारोहण स्थळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. तसेच सोईनूसार जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.